पेट्रोल 85 पैशांनी स्वस्त

April 1, 2013 4:12 PM0 commentsViews: 5

01 एप्रिल

नवी दिल्ली : एकीकडे रेल्वे आणि मुंबईत बेस्टच्या दरात वाढ झाली असून दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात आज आणखी 85 पैशांची कपात करण्यात आली आहेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. गेल्या दोन आठवड्यात दुसर्‍यांदा पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. पण ही दरकपात स्थानिक कर किंवा व्हॅट वगळता आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात पेट्रोलची किंमत वेगवेगळी असणार आहे. मागील महिन्यात 15 मार्च रोजी आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्यामुळे पेट्रोलच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्यात आली होती. विशेष मार्च महिन्यात दोनदा 14 दिवसाच्या अंतराने पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यामुळे एकूणच महिन्याभरात 4 रुपये 25 पैशांची कपात करण्यात आली असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

close