आमदार म्हणतात,’आम्ही काहीच केलं नाही’

April 1, 2013 4:37 PM0 commentsViews: 9

01 एप्रिल

मुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणी विधिमंडळाच्या गणपतराव देशमुख समितीनं चौकशी सुरू केली आहे. आज निलंबित आमदार क्षितिज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांची प्रत्येकी 1 तास चौकशी झाली. पीएसआय सचिन सूर्यवंशी यांची सव्वा तास उलटतपासणी झाली. तर मुख्य सुरक्षा अधिकारी शिवाजी बोडखे यांची 20 मिनिटं साक्ष झाली. चौकशीवेळी बोलताना आपण कोणताही गुन्हा केला नाही आणि आपण दोषी नाही, असा दावा दोन्ही आमदारांनी केल्याची माहिती आयबीएन-लोकमतला मिळालीय. तर सचिन सूर्यवंशी तर्कसंगत बोलत नसल्याचं मत समितीनं नोंदवलं आहे. उरलेल्या तीन आमदारांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आपला फोन हरवलाय, असं सचिन सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सूर्यवंशीचे फोन रेकॉर्ड्स समिती ताब्यात घेणार आहेत. तर सुरक्षा अधिकारी शिवाडी बोडखे यांनी आपण काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा ऑर्ड्स घेतल्या आहेत असं म्हटलं आहे. तसंच त्यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांची नावेही आपल्या जबानीत घेतल्याची माहिती मिळतेय. दोन्ही आमदारांना या प्रकरणी दोन दिवसांची तुरूंगाची हवा खावी लागली होती. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर दोन्ही आमदारांची सुटका करण्यात आली होती.

close