गजनीला प्रेक्षकांची पसंती

December 25, 2008 2:45 PM0 commentsViews: 2

25 डिसेंबर, मुंबई ख्रिसमसच्या दिवशी आमीरच्या ' गजनी 'ला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ' गजनी ' सिनेमा रिलिज होण्याच्या एक दोन दिवस आधी सिनेमाच्या कॉपी राइटवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे गजनी रिलिज होत आहे की नाही याची चिंता आमीरच्या चाहत्यांना लागून राहिली होती. मात्र गजनी रिलीज झाला आणि त्याच्या चाहत्यांना तो पसंत पडलाही. कोणाला आमीरचा अभिनय आवडला, तर कुणाला त्याची स्टाइल. काही थिएटरमध्ये गजनीचे प्रीपेड शोही हीट गेले आहेत.

close