बॉक्सर विजेंदर सिंगचा पाय आणखी खोलात

April 1, 2013 5:05 PM0 commentsViews: 5

01 एप्रिल

ऑलिम्पिक मेडल विजेता बॉक्सर विजेंदर सिंग आणखी अडचणीत सापडला आहे. क्रीडा मंत्रालयाने वीजेंदर सिंगची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे. विजेंदर आणि बॉक्सर राम सिंग यांनी डिसेंबर 2012 ते फेब्रुवारी 2013 दरम्यान ड्रग्ज घेतल्याचं पंजाब पोलिसांच्या तपासात पुढे आलं आहे. विजेंदरनं या तीन महिन्यात 12 वेळा ड्रग्ज घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विजेंदरसाठी त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे ड्रग्ज रॅकेटमध्ये विजेंदरचा सहभाग नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

close