आशिष ताम्हणे मारहाणप्रकरणी चांदेरे बंधूंना अटक

April 2, 2013 10:11 AM0 commentsViews: 36

02 एप्रिल

पुणे : इथं वकील आशिष ताम्हणे मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांची दोन मुलं समीर आणि किरण चांदेरे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. चांदेरे बंधुंवरती राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते वकील आशिष ताम्हाणे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. गेल्या शनिवारी ताम्हाणे यांच्यावर चांदेरे बंधू आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला होता. त्यांच्यावर चतुश्रुंगी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. राजकीय वैमनस्यातून घटना घडल्याचा संशय आहे. गेल्या 4 दिवसांपासून हे दोघेही फरार होते. आता काही वेळात त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल.

close