पंतप्रधानांनी दुष्काळी भागाची पाहणी करावी -राजनाथ सिंह

April 2, 2013 10:41 AM0 commentsViews: 16

02 एप्रिल

जालना : महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. दुष्काळामुळे जनावरांना कमी किमतीत विकावं लागण्याची नामुष्की शेतकर्‍यांवर आली आहे.सरकारकडून टँकरद्वारे पुरवलेलं पिण्याचं पाणी जनावरांच्याही पिण्याच्या लायकीचं नाही. अशा दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना शून्य टक्के दरानं कर्ज द्यावं अशी मागणी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली आहे. सिंह यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत ही मागणी केली. तसंच देशाचं एक राज्य दुष्काळांनी होरपळून निघत आहे अशा या नाजूक परिस्थिती पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दुष्काळग्रस्तांची भेट घ्यावी अशी सूचनाही राजनाथ सिंह यांनी केली. या सरकारकडे ठोस योजना नसल्यामुळे दुष्काळाला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे असा आरोप करत दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी महाराष्ट्रातल्या जनतेनं पुढं यावं, असं आवाहनही राजनाथसिंह यांनी केलं आहे.

close