विजेंदरच्या डोपिंग टेस्टला ‘नाडा’चा नकार

April 2, 2013 11:36 AM0 commentsViews: 10

02 एप्रिल

नियमांप्रमाणे आपण बॉक्सर विजेंदर सिंगची उत्तेजक द्रव्य चाचणी करू शकत नाही असं नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडानं स्पष्ट केलं आहे अशी माहिती सीएनएन आयबीएनला मिळालीय. विजेंदर सिंगची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचा आदेश काल क्रीडा मंत्रालयाने नाडाला दिला होता. मात्र, नाडा फक्त कामगिरी उंचावण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ड्रग्जसाठी चाचणी करू शकते. त्यामध्ये हेरॉईनचा समावेश होत नाही, तसंच खेळाडू क्रीडास्पर्धेत सहभागी असतानाच नाडा ही चाचणी करू शकते. आणि सध्या विजेंदर कोणत्याही स्पर्धेत सहभागी झालेला नाही. त्यामुळे नाडानं विजेंदरची ड्रग्ज टेस्ट करण्यास नकार दिल्याचं समजतं.

close