आमदार निधी वाटपात सरकारकडून पक्षपातीपणा -खडसे

April 2, 2013 3:21 PM0 commentsViews: 58

02 एप्रिल

मुंबई : आमदार निधीच्या वाटपात सरकार पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला. सत्ताधारी पक्षाच्या मतदारसंघांमध्येच आमदार निधीचा बहुतेक पैसा खर्च केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदांमार्फत मुलभूत सुविधांसाठी दिला जाणारा निधी समन्यायी तत्त्वावर दिला जात नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदारच हा निधी आपसात वाटून घेतात असा आरोप खडसेंनी केला. पाण्याची पातळी दोन मिटरनं खाली गेली म्हणून 15 तालुक्यांमध्ये प्रत्येकी दहा कोटीप्रमाणे 150 कोटींचं वाटप झालं. पण ते सर्व वाटप सातारा, सांगली, पुणे या भागातच करण्यात आलं. 900 कोटी रूपयांचा कोयना भूकंप निधी गेल्या पाच वर्षांपासून पडून आहे. पण विरोधी पक्षाचा मतदारसंघ आहे म्हणून त्याचं वाटप केलं जात नाही, असा आरोप खडसेंनी केला. यावेळी विरोधक आक्रमक झाल्यानं सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि अखेर अध्यक्षांनी विधानसभा दिवसभरासाठी तहकूब केली.

close