MPSC च्या वेबसाईटचा डाटा करप्ट, पुन्हा फॉर्म भरा !

April 2, 2013 3:30 PM0 commentsViews: 67

02 एप्रिल

महाराष्ट्र सेवा आयोग अर्थात 'एमपीएससी'ची येत्या रविवारी नियोजित असलेली पूर्वपरीक्षा परीक्षा अडचणीत सापडली आहे. एमपीएससीच्या वेबसाईटमध्ये व्हायरस घुसला आहे. या व्हायरसमुळे परीक्षार्थ्यांनी भरलेल्या अर्जांचा ऑनलाईन डेटा करप्ट झालाय. त्यामुळे परिक्षाथीर्ंना आता पुन्हा नव्यानं फॉर्म भरावे लागणार आहे. दोन ते सव्वा दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठी चिंतेची परिस्थिती आहे. 7 एप्रिलला म्हणजे येत्या रविवारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा आहे. परीक्षार्थ्यांनी 4 एप्रिलपर्यंत पुन्हा फॉर्म भरून द्यावे असं आवाहन एमपीएससीकडून करण्यात आलं आहे. पण, इतक्या कमी कालावधीत नव्याने अर्ज भरता येतील का आणि पुढची प्रक्रिया पार पडेल का हा मोठा प्रश्न आहे. कारण, लाखो विद्यार्थी दोन दिवसात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट उघडतील त्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याच धोका आहे.

एमपीएससीची वेबसाईट -www.mpsc.gov.in

close