चांद्रयानाने नवीन फोटो पाठवले

December 25, 2008 5:52 PM0 commentsViews: 6

25 डिसेंबर चांद्रयान- 1 नं चंद्रावरच्या पृष्ठभागावर नवा प्रकाश टाकला आहे. या यानावरील एम-3 म्हणजेच मून मिनरालॉजी मॅपर या उपकरणानं चंद्राच्या पृष्ठभागाचे नवीन फोटो घेतले आहेत. त्या फोटोमुळे चंद्राच्या पृष्ठभागाविषयी नव्यानं माहिती मिळत आहे. अमोल एम-3 हा चांद्रयानाला जोडलेल्या 11 उपकरणांपैकी एक आहे. या फोटोमुळे आता शास्त्रज्ञांना चंद्राविषयी नवं संशोधन करायला मदत होणार आहे. चंद्रापासून 100 किलोमीटर अंतराच्या कक्षेत असताना हे फोटो घेण्यात आलेत. चंद्रावरचे खडक आणि खनिजामधल्या बदलांबाबत या फोटोतून नवी माहिती मिळणार आहे.

close