‘आयपीएलकडून थकीत 9 कोटी वसूल करा’

April 2, 2013 4:40 PM0 commentsViews: 7

02 एप्रिल

आयपीएलसाठी पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यव्यस्थेची थकीत बिलं 18 एप्रिलपर्यंत वसूल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. थकीत रक्कम असणार्‍या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. व्हीसीए, एमसीए आणि आयपीएलच्या आयोजकांकडे सुरक्षेपोटी जवळपास 9 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत. दरम्यान, कोलकात्यात आयपीएलच्या दिमाखदार सोहळ्याला निदर्शनाचं गालबोट लागलं. किंगफिशर कंपनी आयपीएलची प्रायोजक आहे. पण, या कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना गेल्या दहा महिन्यांपासून वेतन दिलेलं नाही. त्यामुळे किंगफिशरच्या कर्मचार्‍यांनी कोलकाता स्टेडियमबाहेर आणि दिल्ली एअरपोर्टबाहेर निदर्शनं केली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मॅचेसदरम्यानही हे कर्मचारी निदर्शनं करणार आहेत.

close