‘MPSCची परीक्षा पुढे ढकला’

April 3, 2013 9:09 AM0 commentsViews: 60

03 एप्रिल

मुंबई : ऐन पाच दिवसांवर राज्य सेवा आयोग अर्थात MPSC ची परीक्षा आली असताना वेबसाईटवर व्हायरस हल्ल्यामुळे परिक्षाथीर्ंचा डाटा करप्ट झाला आहेत. त्यामुळे परीक्षाथीर्ंना पुन्हा एकदा फॉर्म भरावे लागणार आहे. मात्र दोन दिवसात फॉर्म भरण्याची मुदत दिल्यामुळे परीक्षार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला आहे. एमपीएससीची परीक्षा 15 दिवस परीक्षा पुढं ढकलण्याच निर्णय घ्यावा असे निर्देश सभापती शिवाजीराव देशमुख यांनी दिले आहेत. जर दोन दिवसात रजिस्ट्रेशन न झाल्यास परीक्षा पुढं ढकलण्याचा विचार करू असं सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी स्पष्ट केलं आहे. औचित्याच्या मुद्याव्दारे विधान परिषदेत त्यांनीही हे स्पष्टीकरण दिले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवेदन करणार आहे. त्यामुळे परीक्षा ढकल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, MPSCच्या बेपर्वा कारभाराविरोधात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत निदर्शनं केली. फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हातात फारच कमी कालावधी उरला असल्यामुळं परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी या दोन्ही पक्षांनी केली आहे. विद्यार्थ्यांनासुद्धा एमपीएससीला कळकळीचं आवाहन केलंय की, परीक्षा पुढे ढकलण्यात यावा. फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना नव्यानं अडचणी येताहेत. वेबसाईटमध्ये लॉग इन करता येत नसल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. तसंच ग्रामीण भागात वीज जात असल्यामुळे इंटरनेटवर फॉर्म भरता येत नाही.

आयबीएन लोकमतचे सवाल

1. 2 ते 2.15 लाख मुलांनी 48 तासांत लॉग इन करतील तेव्हा सर्व्हर डाऊन होऊ शकतो, त्यासाठी काय केलंय?2. ज्या मुलांचा रजिस्ट्रेशन आयडी गहाळ झालाय, त्यांनी फॉर्म कसा भरायचा ?3. ज्या मुलांचं चलन/ट्रान्सॅक्शन आयडी नाहीये, त्यांनी फॉर्म कसा भरायचा ?4. वेळ अत्यल्प असल्यामुळे MPSC आणि चलन देणार्‍या बँका अहोरात्र सुरू राहणार का ?5. ग्रामीण भागातल्या फॉर्म नव्यानं भरण्याची माहिती 48 तासांत कशी पुरवणार ?6. ज्या मुलांपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही, त्यांचं नुकसान MPSC भरून देणार का ?7. MPSCच्या वेबसाईटचं कंत्राट ज्यांना देण्यात आलं, त्यांच्यावर कारवाई होणार का ?8. सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांना SMS करण्याचं MPSCचं आश्वासन व्यवहार्य आहे क ा?9. इतक्या महत्त्वाच्या परीक्षेचा बॅकअप डेटा का नव्हता?10. परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करून विद्यार्थ्यांना दिलासा देणार का?11. सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांच्या मनस्तापाला जबाबदार कोण?

close