माथेफिरू संतोष मानेचा आज फैसला

April 3, 2013 9:32 AM0 commentsViews: 16

03 एप्रिल

पुणे : इथं एसटी बस बेदरकारपणे चालवून 9 जणांचा बळी घेणार्‍या माथेफिरू संतोष मानेचा आज फैसला होणार आहे. मागील वर्षी जानेवारी 2012मध्ये संतोष माने या ड्रायव्हरनं स्वारगेट स्थानकातून बस पळवून रस्त्यावर बेदरकारपणे चालवली होती. त्यावेळी त्यानं नागरिकांना आणि गाड्यांना उडवलं होतं. त्यात 9 जणांचा जीव गेला होता, तर 27 जण जखमी झाले होते. या खटल्याची सुनावणी गेल्या 10 महिन्यांपासून सुरू होती. त्यात जवळपास 39 जणांची साक्ष यात नोंदवली गेली. संतोष माने हा मनोरुग्ण असल्याचा युक्तिवाद त्याच्या घरच्यांनी केला होता. एक वर्षानंतर या घटनेचा काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close