औरंगाबादमधल्या हॉटेल्सनी नो सेलिब्रेशन जाहीर केलं

December 25, 2008 10:21 AM0 commentsViews: 1

25 डिसेंबर औरंगाबाद संजय वरकड मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या वेदना आजही जिवंत आहेत. त्यामुळेच दिल्ली, मुंबई पाठोपाठ आता औरंगाबादेतील पंचतारांकित हॉटेल्सनी यावर्षी नाताळ आणि थर्टीफस्टचं सेलिब्रेशनच रद्द केलं आहे. नाचगाणी, आरडाओरड आणि चिअर्स न करता नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा निर्णय अनेक हॉटेल मालकांनीही घेतला आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हॉटेलच्या शेफना बोलायला सुध्दा उसंत मिळत नसते. पण यावर्षी ते शांतपणे काम करीत आहेत. कारण मुंबईवरील हल्ल्यामुळे नाताळ आणि थर्टीफस्टचं सेलिब्रेशन करायचं नाही, असा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनानं घेतला आहे. औरंगाबादेतील रामा इंटरनॅशनल, अजंता अ‍ॅम्बॅसडर या दोन पंचतारांकित हॉटेल्सनं नो सेलिब्रेशनं जाहीर केलं आहे. आता ताज रेसिडेन्सिमध्येही त्यावर विचार सुरू आहे. तसंच इतर हॉटेल्समध्येही धांगडधिंगा करायचा नाही, असं ठरलंय. मुंबईवरील हल्यानंतर राजकीय पक्षांना जे भान आलं नाही. ते भान पंचतारांकित हॉटेल्सच्या व्यवस्थापनानं दाखवून दिलं. 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन रद्द करून त्यांनी सर्वांच्याच डोळ्यात अंजन घातलं. नाताळ आणि थर्टीफर्स्टच्या कार्यक्रमांविषयी या हॉटेलकडे लोकांकडून रोज विचारणा होतेय, पण नो सेलिब्रेशनच्या मुद्यावर पंचतारांकित हॉटेलचालक ठाम आहेत

close