देशाच्या विकासासाठी उद्योजकांनीही पुढे यावं -पंतप्रधान

April 3, 2013 11:22 AM0 commentsViews: 17

03 एप्रिल

आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा देशातल्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. मात्र, काही काळात ही परिस्थिती सुधारून पुन्हा एकदा देशातली अर्थव्यवस्था सुदृढ होईल असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज व्यक्त केला. सीआयआयच्या परिषदेत बोलताना ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था खासगी उद्योजकांच्या हातात आहे, देशाच्या विकासासाठी सरकारबरोबरच उद्योजकांनीही पुढे आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. बारावी पंचवार्षिक योजना सफल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच देशात सबसिडीचं प्रमाण कमी केल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रशंसा होत आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं.

close