माथेफिरू संतोष माने दोषी

April 3, 2013 2:00 PM0 commentsViews: 58

03 एप्रिल

पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवून 9 जणांना चिरडणारा ड्रायव्हर संतोष माने याला कोर्टाने दोषी धरलंय. सेशन्स कोर्टाने कलम 302, 307, 324 आणि 427 नुसार संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलंय. त्याला सोमवारी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 25 जानेवारीला संतोष मानेनं स्वारगेट स्थानकातून बस पळवून पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे चालवली होती. त्यावेळी त्याने नागरिकांना आणि गाड्यांना उडवलं होतं. त्यात 9 जणांचा जीव गेला होता, तर 27 जण जखमी झाले होते. या खटल्याची सुनावणी गेल्या 10 महिन्यांपासून सुरू होती. त्यात जवळपास 39 जणांची साक्ष यात नोंदवली गेली. संतोष माने हा मनोरुग्ण असल्याचा युक्तिवाद त्याच्या घरच्यांनी केला होता.

काय झालं होतं 25 जानेवारी 2012 रोजी ?

- 41 वर्षांचा संतोष माने हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे- 2 फेब्रुवारीला त्यानं स्वारगेट डेपोतून पुणे-सातारा ही बस पळवली – आणि जवळपास तासभर पुण्यातल्या रस्त्यावर धुमाकूळ घातला- सोलापूरच्या दिशेनं राँग साईडनं अंदाधुंद गाडी चालवली- यात 9 जण ठार तर 27 जण जखमी झाले, 25 वाहनांना धडकही दिली- त्याला अटकाव करण्यासाठी मार्शल्सना पाचारण करण्यात आलं- पण, तब्बल तासाभरानंतर काही विद्यार्थ्यांच्या मदतीनं बस थांबवून मानेला अटक झाली- त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते- सुरुवातीला त्यानं आपण मनोरुग्ण असल्याचा कांगावाही केला होता

close