मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्यता निधीत 55 कोटी जमा

April 3, 2013 5:35 PM0 commentsViews: 129

03 एप्रिल

मुंबई : दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सरकारच्या आवाहनानंतर चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत दुष्काळासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 55 कोटींचा निधी जमा झाले आहेत. या निधीत सिद्धीविनायक ट्रस्टकडून 25 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 2 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रकडून 2 कोटी 51 लाख आणि इतर अनेक संस्थांकडून मदत मिळालीय. तुम्हालाही दुष्काळासाठी मदत करायची असल्यास थेट बँकेत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात चेकद्वारे ही मदत करता येईल असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय.

देणगीदार थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत आपला चेक किंवा ड्राफ्ट जमा करू शकतात. हे चेक किंवा ड्राफ्ट 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ 2013)' किंवा 'Chief Minister Relief Fund (Drought 2013)' या नावे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखा,मुंबई अथवा अकाऊंट नंबर SB 32860305777 या खात्यात जमा करू शकतात. या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर देणगदारांनी पत्राद्वारे 'लेखाधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई- 32' या पत्त्यावर बँकेच्या पावतीसह कळवल्यास त्यांना योग्य ती पावती पाठवली जाईल. अधिक माहितीसाठी आपण मुख्यमंत्री निधी कक्ष 022-22026948 किंवा 022-22022940 या क्रमांकावर संपर्क साधू शकता..

close