आज मुंबई इंडियन्स -रॉयल चॅलेंजर्स आमने सामने

April 4, 2013 11:46 AM0 commentsViews: 29

04 एप्रिल

बंगलोर : आयपीएलमध्ये आज दोन बलाढ्य टीम आमने सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्सची टक्कर आहे ती घरच्या मैदानावर खेळणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी… बंगलोरच्या मैदानावर रात्री 8 वाजता ही मॅच रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व यंदा नव्या कॅप्टनकडे सोपवण्यात आलं आहेत. पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सकडून खेळणार्‍या रिकी पॉण्टिंगवर टीमची जबाबदारी असणार आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉण्टिंग एकत्र खेळताना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. तर बंगोलरची मदार युवा विराट कोहलीवर असणार आहे. गेल्या हंगामात बंगलोरला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. पण यंदा घरच्या मैदानावर विजयी सलामी देण्यासाटी कोहलीची टीम उत्सुक आहे.

close