आमदार निधी वाटपावरून विरोधकांची घोषणाबाजी

April 4, 2013 11:59 AM0 commentsViews: 62

04 एप्रिल

मुंबई : आमदार निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर सोमवारपर्यंत बहिष्कार टाकलाय. सत्ताधारी पक्षाच्या मतदारसंघांमध्येच आमदार निधीचा बहुतेक पैसा खर्च केला जातो, असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला होता. या बाबत लवकरच न्यायनिवाडा करण्याची मागणी आमदारांनी केली आहेत.

close