कुश कटारियाच्या मारेकर्‍याला दुहेरी जन्मठेप

April 4, 2013 12:08 PM0 commentsViews: 37

04 एप्रिल

नागपूर : इथं 2011 मध्ये झालेल्या कुश कटारिया अपहरण आणि हत्या प्रकरणी दोषी आयुष पुगलियाला दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आलीय. एक जन्मठेप पूर्ण केल्यावर दुसरी जन्मठेप भोगण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जी. जे. अकर्ते यांच्या कोर्टाने दिले आहेत. नवीन आणि नितीन या इतर दोन आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केलीय. नागपूरचे प्रसिद्ध व्यावसायिक सुरुची या मसाला कंपनीचे मालक प्रशांत कटारिया यांचा मुलगा कुशचा 11 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांच्याच शेजारी राहणार्‍या आयुष पुगलियाने अपहरण करुन खून केला होता. आयुषचा भाऊ नवीनला कोर्टाने या घटनेची माहिती असून ती लपवल्याच्या प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे जी त्याने भोगली आहे. तर आयुषचा आणखी एक भाऊ नितिनला कोर्टाने निर्दोष सोडले आहे. आरोपी आयुष पुगलिया याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यासाठी हायकोर्टात अपील करणार असल्याचे या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले.

close