गडचिरोलीत चकमकीत 7 नक्षलवादी ठार

April 4, 2013 2:48 PM0 commentsViews: 13

04 एप्रिल

गडचिरोली : इथं भामरागड तालुक्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमकीच यात 7 माओवावादी ठार झाले. तर 3 पोलीस जखमी झाले आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर असलेल्या इंद्रावती नदीच्या तीरावर ही घटना घडलीय. 7 पैकी 5 माओवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यात 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. सा सगळ्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. भामरागड तालुक्यात दोन दिवसांपासून माओवाद्यांच्या विरोधात कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं. इंद्रावती नदीच्या तीरावर माओवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे 4 वाजता नेलगोंडावरून भामरागडचे डीवायएसपी विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सी- 60 या नक्षलवादी विरोधी पथकानं कारवाई केली.

close