पुण्यात एलबीटी विरोधात व्यापार्‍यांचा महामोर्चा

April 5, 2013 10:11 AM0 commentsViews: 13

05 एप्रिल

पुणे : इथं एलबीटीच्या विरोधातील बंदचा 5 व्या दिवशी व्यापार्‍यांनी कसबा गणपती पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. यात हजारो व्यापारी सहभागी झाले होते. राज्यात 5 महापालिकेत जकात रद्द करून एलबीटी लागू करण्यात आली आहे. एलबीटीला पुण्यातील व्यापार्‍यांनी कडाडून विरोध केला आहे. एलबीटीच्या विरोधात गेल्या 5 दिवसांपासून शहरातील सर्व व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या संपाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि व्यापार्‍यांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

close