राणेंनी घेतली शरद पवारांची भेट

December 26, 2008 10:20 AM0 commentsViews: 5

26 डिसेंबर, मुंबईकाँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पवार मुंबईत होते. त्यावेळी पवार यांच्या मुंबईतल्या घरी ही भेट झाली. नारायण राणे हे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेचं अधिवेशन संपलं की ते याबाबत घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय. राणे यांची ताकद मुंबई आणि कोकणात आहे. विधानसभेच्या जागा लक्षात घेतल्या तर मुंबई आणि कोकणात 75 मतदारसंघ आहेत. त्यामुळं या ठिकाणी राणे फॅक्टर उपयोगी पडू शकतो याची जाणिव राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. महाराष्ट्रात पवार आणि राणे यांची हातमिळवणी झालीच तर कोणती नवी राजकीय समीकरणं तयार होणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close