प्राध्यापक बहिष्कारावर अजूनही ठाम

April 5, 2013 10:16 AM0 commentsViews: 16

05 एप्रिल

मुंबई : प्राध्यापकांच्या बहिष्काराचा आज 60 वा दिवस उजाडलाय. अजूनही राज्य सरकारकडून लेखी आश्वासन मिळालेलं नाही अशी एमफुक्टोची तक्रार आहे. प्राध्यापकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी 1500 कोटी देण्याचं सरकारने आश्वासन देऊन सुध्दा एमफुक्टोची आठमुठी भुमिका कायम आहे.अधिवेशनात याबाबत राजेश टोपे यांनी घोषणा केली होती. पण लेखी आश्वासन दिल्याशिवाय किंवा चर्चा झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असं एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी स्पष्ट केलंय. पण मार्च महिन्याचं प्राध्यापकांचं वेतन रोखण्याचा आदेश दिल्याचं सरकारचं म्हणणं आहे, मात्र अशी कोणतीही सूचना मिळाली नसल्याची एमफुक्टोचं म्हणणं आहे. एमफुक्टोच्या या आडमुठ्या भुमिकेमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं आहे.

close