केजरीवाल उद्या उपोषण सोडणार

April 5, 2013 10:22 AM0 commentsViews: 11

05 एप्रिल

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे कोणत्याही आश्वासनाशिवायच उद्या आपलं उपोषण मागं घेण्याची शक्यता आहे. ते गेल्या 14 दिवसांपासून उपोषणावर आहेत. दिल्ली सरकारनं पाणीपट्टी आणि वीजदर कमी करावे अशी त्यांची मुख्य मागणी आहे. मात्र, दिल्ली सरकारने त्यांची फारशी दखल घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यातर्फे एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांची एकही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. केजरीवाल यांची प्रकृती झपाट्याने खालावत आहे, दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार ते उद्या उपोषण मागं घेत असल्याचं समजतं. त्यानंतर ते 25 एप्रिलपासून वीज आणि पाण्याच्या मुद्द्यावरूनच नवे आंदोलन सुरू करणार आहे.

close