इमारत दुर्घटनेप्रकरणी विभागीय उपायुक्त निलंबित

April 5, 2013 2:47 PM0 commentsViews: 7

05 एप्रिल

ठाणे इमारत दुर्घटनेप्रकरणी ठाणे पालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण आणि डायघर पोलीस स्टेशनचे सीनिअर पीआय नाईक यांना निलंबित करण्यात आलं आहे. नाईक अनधिकृत बांधकामांसाठी हप्ता घेत असल्याचा आरोप आहे. तसंच नगरविकासच्या अप्पर मुख्य सचिवांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. आणि घटनेचा आढावा घेतला. विधानसभेतही या अपघाताचा मुद्दा उपस्थित झाला.

close