‘राहुल गांधी पंतप्रधान झाले तर स्वागतच’

April 5, 2013 5:13 PM0 commentsViews: 16

05 एप्रिल

काँग्रेसमधून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण होणार ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. यावर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. तिसर्‍यांदा पंतप्रधान होण्याचा मुद्दा हा काल्पनिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्याचं स्वागतच करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच गुरूवारी सीआयआयमध्ये राहुल गांधी यांनी केलेलं भाषण हे उत्कृष्ट होतं, अशी पावतीही त्यांनी दिली. तर दोन सत्ताकेंद्रांचा मुद्दाही खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close