चॅम्पियन्स ट्रॉफीतून सेहवाग, हरभजनला डच्चू

April 6, 2013 8:57 AM0 commentsViews: 47

06 एप्रिल

खराब फॉर्ममध्ये असणार्‍या वीरेंद्र सेहवागला आणखी एक धक्का बसला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या भारताच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या यादीतून त्याला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्यासोबत हरभजन सिंग आणि चेतेश्वर पुजारालाही डच्चू मिळालाय. तर अंडर -19 टीमचा कप्तान उन्मुक्त चंद आणि जम्मू काश्मिरचा फास्टर बॉलर परवेझ रसूलचा या 30 जणांच्या यादीत समावेश करण्यात आला. गेल्या काही मॅचपासून सेहवागचा सुर हरपलाय. त्याला ऑस्ट्रेलियाच्या विरोधातही फक्त दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण खराब फॉर्म मुळे सेहवागला इतर सामन्यातून वगळण्यात आलं होतं. चॅम्पियन ट्रॉफीत मराठमोळ्या केदार जाधव, मध्यप्रदेशचा जलज सक्सेना आणि ईश्वर पांडे आणि पंजाबचा सिद्धार्थ कौर यांची संभाव्य यादीत समावेश करण्यात आला आहे. आयपीएल संपल्यानंतर इंग्लंडमध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळवली जाणार आहे.

close