ठाणे इमारत दुर्घटनेत बळीचा आकडा 72 वर

April 6, 2013 9:09 AM0 commentsViews: 10

06 एप्रिल

ठाणे जिल्ह्यातल्या शिळफाट्याजवळच्या इमारत दुर्घटनेत बळींची संख्या आता 72 झालीय. तर, जखमींची संख्या 62 आहे. त्यांच्यावर ठाण्यातल्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 26 पुरुष, 20 महिला, 11 मुलं आणि 15 मुलींचा समावेश आहे. 42 तासांनंतरही ढिगारा उपसण्याचं काम सुरूच आहे. ढिगार्‍याखाली अजूनही काहीजण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, या इमारतीच्या बिल्डर्सच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सलीम शेख या बिल्डरला ठाणे क्राईम ब्रँचनं अटक केलीय. तर त्याचा पार्टनर जमील कुरेशी अजून फरार आहे.

close