लक्ष्मण मानेंविरोधात आणखी एका महिलेची तक्रार

April 6, 2013 9:21 AM0 commentsViews: 7

06 एप्रिल

'उपरा'कार लक्ष्मण माने यांच्याविरोधात आणखी एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे लक्ष्मण माने आणखी अडचणीत आले आहेत. ही महिलादेखील याच संस्थेत काम करत होती. 1999 ते 2001 या काळात आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार तिनं केली आहे. याआधी संस्थेतल्या पाच महिलांनी माने यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर माने 13 दिवसांपासून फरार आहेत. माने अजूनही शरण न आल्यानं त्यांच्यावरचा संशय बळावला आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सातारा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

close