टँकरच्या धडकेनं बेस्ट बस उलटली, 15 जण जखमी

April 6, 2013 1:04 PM0 commentsViews: 30

06 एप्रिल

मुंबई : इथं सांताक्रूझमध्ये टँकरच्या धडकेनं बेस्टची बस उलटली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झालेत. जखमींना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. टँकरनं धडक दिल्याने एअरपोर्टजवळच्या फ्लायओव्हरवर ही बस उलटली. त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवरची ट्रॅफिक काही काळ जाम झाली होती. 371 नंबरची ही बस अंधेरीहून वाकोल्याला जात होती. त्यावेळी हा अपघात घडला.

close