अखेर केजरीवाल यांनी सोडलं उपोषण

April 6, 2013 2:41 PM0 commentsViews: 10

06 एप्रिल

दिल्लीत आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी आपलं उपोषण सोडलंय. गेले 14 दिवस केजरीवाल यांचं उपोषण सुरु होतं. आज संध्याकाळी नारळ पाणी घेऊन केजरीवाल यांनी उपोषण सोडलं. दिल्लीमधील वीज आणि पाणी दरवाढीविरोधात अरविंद केजरीवाल यांनी हे उपोषण केलं.पण दिल्ली सरकारनं त्याची फार काही दखल घेतली नव्हती. पण तब्बल 10 लाख दिल्लीकरांनी सरकारविरोधीतील याचिकेवर सही केली असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. पण उपोषण जरी सोडत असलं तरी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.

close