पुण्यातील व्यापार्‍यांचा बंद 2 दिवस स्थगित

April 6, 2013 2:53 PM0 commentsViews: 14

06 एप्रिल

पुणे : इथं एलबीटी (LBT) विरोधात गेले 6 दिवस सुरू असलेला व्यापार्‍यांचा बेमुदत बंद 2 दिवस स्थगित करण्यात आलंय. शनिवार 6 एप्रिलला संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत व्यापारी प्रतिनिधींची पुण्यात बैठक झाली. त्यानुसार सोमवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत व्यापार्‍यांची चर्चा होईल. विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री निवेदन करतील. जर व्यापार्‍यांच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या तर स्थगित केलेला बंद मागे घेण्यात येईल अशी माहिती फत्तेचंद रांका आणि पोपट ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याआधी व्यापार्‍यांच्या बैठकीत बंद स्थगित करण्यावरून मतभेद झाल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. गेले 6 दिवस सुरू असलेल्या बंदमधे छोटे व्यापारीही सहभागी झाल्यानं सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

close