राजस्थानचा दिल्लीवर ‘रॉयल’ विजय

April 6, 2013 5:49 PM0 commentsViews: 13

06 एप्रिल

राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सनं आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली. राजस्थान रॉयल्सनं दिल्लीच्या घरच्या मैदानावर हल्लाबोल करत दिल्लीचा 5 रन्सनं पराभव केला, राहुल द्रविडची कॅप्टन इनिंग आणि स्टुअर्ट बिन्नीच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थाननं पहिली बॅटिंग करत 165 रन्स केले. विजयाचं आव्हान समोर ठेवून खेळणार्‍या दिल्लीची सुरुवात दमदार झाली. डेव्हिड वॉर्नर आणि उन्मुक्त चंदनं पहिल्या विकेटसाठी 39 रन्सची पार्टनरशिप केली. पण उन्मुक्त चंद 23 रन्सवर आऊट झाला आणि यानंतर दिल्लीची बॅटिंग गडगडली. वॉर्नरनं एकाकी झुंज देत शानदार 77 रन्स केले. पण तो विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी दिल्लीला 9 रन्सची गरज होती. पण राजस्थानचा बॉलर केवन कुपरनं फक्त 4 रन्स देत 2 विकेट घेतल्या आणि राजस्थानला शानदार विजय मिळवून दिला.

close