माथेफिरू संतोष मानेला फाशी

April 8, 2013 9:31 AM0 commentsViews: 13

08 एप्रिल

पुण्यात वर्षभरापूर्वी बेदरकारपणे एस टी बस चालवून 9 निष्पापांचा बळी घेतलेल्या माथेफिरू एसटी ड्रायव्हर संतोष माने याला पुणे सेशन्स कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्य वध, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणे या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलं होतं. स्वारगेट एसटी स्थानकातून बस पळवून नेऊन संतोष मानेनं पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे चालवली होती. यामध्ये 9 जणांचा बळी गेला होता तर 27 जण जखमी झाले होते. संतोष माने याची मानसिक स्थिती ठीक असल्याचं सरकारी वकिलांनी सिद्ध केलं. हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा असल्याचं सांगत संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयामुळे अशी सरकारी वकील आणि पीडितांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच या निकालाबद्दल अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी समाधान व्यक्त केलंय.

close