दहशतवादाविरुद्ध एकत्र या – चिदंबरम

December 26, 2008 12:14 PM0 commentsViews: 1

26 डिसेंबर, दिल्लीदहशतवादावर विजय मिळवायचा असेल तर लोकांचे आणि सरकारचे एकत्रित प्रयत्न असणं गरजेचे आहेत.प्राथमिक जबाबदारी जरी सरकारची असली तरी नागरिक अनेक प्रकारे सहकार्य करु शकतात. दहशतवाद निपटून काढण्यात नागरिकांनी आपलं योगदान द्यावंअसं आवाहन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलं आहे. सीएनएन आयबीएन चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई हे 'सिटीझन अगेन्स्ट टेरर' या हिंदुस्थान टाईम्स आणि सीएनएन आयबीएन च्या संयुक्त मोहिमेसंदर्भात त्यांना भेटायला गेले असतांना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "नागरिक अनेक प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे कायद्याशी बांधिलकी राखणे. कायद्यात त्रुटी असू शकतात. त्या सुधारण्याच्या कामी वेळ लागतो. पण नागरिकांनी कायद्याशी बांधिलकी राखणं महत्त्वाचं आहे. नागरिकांनी आपल्या आजुबाजुला घडणार्‍या घटनांविषयी दक्ष असलं पाहिजे" असं ते म्हणाले.

close