गोवंडीत पाईपलाईन फुटल्यामुळे दोघांचा मृत्यू

April 8, 2013 9:48 AM0 commentsViews: 9

08 एप्रिल

मुंबई : येथील गोवंडीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे इमारतीमध्ये पाणी शिरून त्यात गुदमरून दोघांचा मृत्यू झालाय. गोवंडीमध्ये पहाटे पाच वाजता ही पाईपलाईन फुटली. या पाईप लाईन मधुन पाणी पुरवठा होत नव्हता पण आज सकाळी अचानक फुल पे्रशरने पाणी पुरवठा सुरू झाल्याने ही पाईप लाईन फुटली. या पाईपलाईनवर बांधण्यात आलेल्या संजीवनी बिल्डींगमध्ये पाणी शिरलं. त्यामध्ये तळघरात राहणारे नऊ रहिवासी अडकले. यापैकी देवीसिंग हजारे आणि सुनंदा भंडारे यांचा मृत्यू झाला. तर इतर सात जणांचा श्वास गुदमरल्यामुळे त्यांना शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. यामध्ये एक नऊ वर्षांची लहान मुलीचाही समावेश आहे. तर एका गंभीर जखमीला सायन हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

close