राज ठाकरेंना जळगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

April 8, 2013 12:13 PM0 commentsViews: 51

08 एप्रिल

जळगाव : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव कोर्टाने जामीन मंजूर केलाय. सार्वजनिक मालमत्ता नासधूस प्रकरणी राज ठाकरे आज कोर्टात हजर झाले. उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यांचे पडसाद राज्यभर उमटले होते. जळगावामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अटकेचा निषेध करत वाहनांची नासधूस केली होती. याबाबत राज यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. त्या प्रकरणी राज यांना या अगोदर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र व्यक्तिगत कामामुळे ठाकरे हजर राहु शकले नाही. अखेरीस आज 8 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीसाठी राज ठाकरे कोर्टात हजर झाले होते. त्यांना आज 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.तसंच यापुढे सुनावणीसाठी हजर न राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

close