पोलिसावर हल्ला प्रकरणी नगरसेवकपुत्र फरार

March 27, 2013 1:13 PM0 commentsViews: 15

27 मार्चराज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडगिरी सरेआम सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात एका वृद्ध महिलेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. तर मंगळवारी धुळ्यात एका सहपोलीस निरीक्षकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केला. या घटनेला 24 तासही उलटले नव्हते तोच पुण्यातही असाच एक प्रकार घडलाय. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा मुलगा समीर आणि त्याच्या साथीदारांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे येथे सहपोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेल्या घटनेला 20 तास उलटले आहेत पण अजूनही एकाही आरोपींला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या प्रकरणी 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धनंजय पाटील यांच्यावरील हल्ला प्रकरणातले दोन मुख्य आरोपी देवेंद्र सोनावर आणि भूषण सोनावर हे नगरसेवक चंद्रकांत सोनावर यांची मुलं आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनावर हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं समोर येतंय. त्यांच्यावर यापूर्वीच धुळ्यात 32, अंमळनेरमध्ये 3 तर पाचोर्‍यात 1 असे एकूण 36 गुन्हे दाखल आहेत. तर त्यांचा मुलगा देवेंद्र सोनावर याच्यावर धुळ्यात 6 तर भूषण सोनावर याच्यावरही 3 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील 25 गुन्हेगारांमध्ये 4 आरोपी हे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

मारहाण प्रकरणी समीर चांदेरेवर गुन्हा दाखलपुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा मुलगा समीर आणि त्याच्या साथीदारांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयामध्ये काम करणारे वकील आशिष ताम्हणे यांना काल संध्याकाळी बानेर परिसरामध्ये समीर चांदेरे आणि त्याच्या साथीदारांनी हत्यारांनी हल्ला चढवला ज्यात ते गंभीर जखमी झाले. याबाबत त्याच्याविरोधात चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आशिष तामणंेना संचेती हॉस्पिटलच्या आयसीयुमधे ऍडमिट करण्यात आलं आहे. याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आशिष ताम्हणे हेदेखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. गेल्या महापालिका निवडणुकीत ताम्हणेंनी चांदेरंेच्या विरोधात काम केल्याचा राग मनात धरुन हा हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे.

close