मुंब्य्रात 70 टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम अनधिकृत !

April 8, 2013 1:49 PM0 commentsViews: 21

08 एप्रिल

ठाण्यात शिळफाटा इथं अनधिकृत इमारत कोसळून 72 जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर अनधिकृत इमारताचे 'गाळे'च समोर आले. मुंब्रा परिसरात सत्तर टक्के बांधकाम अनधिकृत आहे असा अहवाल एस झेंडे यांनी हायकोर्टात दिला होता. जिल्ह्यातल्या अनधिकृत बांधकामाची याचिका तीन वर्षापुर्वी दाखल झाली होती त्यावेळी हा धक्कादायक अहवाल दिला होता. जानेवारी 2012 मध्ये ठाणे महापालिकेनं दिलेल्या आक़डेवारीवरुन मुंब्रा परिसरात सर्वाधिक अनधिकृत बांधकाम असल्याचं स्पष्ट होतंय. महापालिकेच्या नोंदी मुंब्रा परिसरात एकूण 505 अनधिकृत बांधकाम आहेत. नगरसेवक शैलेश पाटील आणि सुनिता मुंडे यांच्या वॉर्डात 121 अनधिकृत इमारती आहेत. नगरसेवक राझीया इक्बाल शेख आणि सिराज डोंगरे यांच्या वॉर्डात 116 अनधिकृत इमारती आहेत. नगरसेवक सिंधू गोटे आणि सुधीर भगत यांच्या वॉर्डात 49 अनधिकृत इमारती आहेत. हा अहवाल महापालिकेनं दिला असला तरी प्रत्यक्षात अनधिकृत इमारतींची संख्या कितीतरी पट जास्त असण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेनं अनधिकृत बांधकामाबाबत काय अहवाल दिली होता ?

- मुंब्रा परिसरात 70 टक्के बांधकाम अनधिकृत- मुंब्रा परिसरात सर्वाधिक अनधिकृत बांधकाम- तीन वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातल्या अनधिकृत बांधकामांबाबत अहवाल- मुंब्रा परिसरात 505 इमारती अनधिकृत- नगरसेवक शैलेश पाटील आणि सुनीता मुंडे यांच्या वॉर्डात 121 अनधिकृत इमारती- नगरसेवक राझिया इक्बाल शेख आणि सिराज डोंगरे यांच्या वॉर्डात 116 अनधिकृत इमारती- नगरसेवक सिंधू गोटे आणि सुधीर भगत यांच्या वॉर्डात 49 अनधिकृत इमारती

close