सदाशिव अमरापूरकरांना धक्काबुक्की

March 27, 2013 1:59 PM0 commentsViews: 34

27 मार्च

अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. अमरापूर मुंबईतल्या वर्सोवा इथं राहतात. याच ठिकाणी काही तरुण मुलं पाण्याची नासाडी करुन होळी खेळत होते. त्यांना हटकलं असता या मुलांनी अमरापूरकर यांना धक्काबुक्की केली. त्यांना शिवीगाळ केली, यावेळी प्रसारमाध्यमाचे कॅमेरामन चित्रिकरण करत होते या तरूणांनी त्यांचे कॅमेरा हिसकावून त्यातील कॅसेट काढून घेतल्या याप्रकरणी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

close