राजीव गांधी स्विडीश कंपनीचे होते एजंट, विकीलिक्सचा गौप्यस्फोट

April 8, 2013 1:53 PM0 commentsViews: 9

08 एप्रिल

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे राजकारणात उतरण्यापूर्वी, साब-स्कॅनिया या स्विडीश कंपनीसाठी मध्यस्थी करत होते असा खळबळजनक दावा विकीलिक्सनं केला आहे. सत्तरीच्या दशकात, साब-स्कॅनिया ही कंपनी त्यांची विगेन ही लढाऊ विमाने भारताला विकण्यासाठी प्रयत्नशील होती. त्यासाठी मध्यस्थ म्हणून राजीव गांधी प्रयत्नशील होते असा उल्लेख तेव्हा अमेरिकी दुतावासानं पाठवलेल्या केबलमध्ये करण्यात आला होता. मात्र, तेव्हा साब-स्कॅनियाला हे कंत्राट मिळालं नव्हतं. तर ब्रिटनच्या जग्वारला मिळालं होतं.

close