परदेशी विद्यार्थ्यांवर पुणे पोलिसांची बारीक नजर

December 26, 2008 1:15 PM0 commentsViews: 5

26 डिसेंबर, पुणेजेमिमा रोहेकर पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. यामुळेच अनेक परदेशी विद्यार्थी इथं शिकायला येतात. पण 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्या मुळं या मुलांना पोलिसांच्या चेकींग आणि कारवाईला सामोरं जावं लागतंय.मुळची मॉरिशियसची असणारी अन्सुया पुण्यातल्या शिक्षणाबाबत ऐकुन इथं आली. पोलिस चेकींग आणि सगळे सोपस्कार पुर्ण केल्यावर तिला इथलं रेसिडेन्शीयल पर्मीट मिळालं. कॉलेज, अभ्यास असं व्यवस्थीच रूटीन सुरु झालं. नुकत्याच मुंबईवर झालेल्या पोलीस अधिक जागरूक झाल्याची ही निशाणी आहे.अन्सुया सारखे एकोणिस हजार विद्यार्थी इथं राहतायत. या सगळ्यांकडे रेसिडेन्शीयल परमीट असल्याची खात्री पोलीस करत आहेत. एवढंच नाही तर पर्मीट नसलेल्या 100 लोकांना त्यांनी त्यांच्या मायदेशी पाठवून दिलं आहे. "रेकार्ड अपडेटट करणं , डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं ही पावलं आम्ही उचलत आहोत. 26/11 च्या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कमी रहाणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतोय" असं पुण्याचे जॉइंट कमिशनर राजेंद्र सोनावणे यांनी सांगितलं.या मुलांना या कारवाईचं महत्व समजतंय. त्यामुळं तेही पोलिसांना पुर्ण सहकार्य करत आहेत. "सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्यच आहे. त्यांचा तो हक्कच आहे. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू" असं मुस्तफा नल्ये या विद्यार्थ्याने सांगितलं.फक्त विद्यार्थीच नाहीत तर सगळ्याच परदेशी लोकांसाठी ही कारवाई पोलिसांनी हाती घेतली आहे. शहरातल्या हॉटेल्सना परदेशी नागरिकांची माहिती देणं पोलिसांनीं बंधनकारक केलं आहे. सगळीकडे असलेल्या भीतीच्या वातावरणात पोलीस कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीत.

close