दुष्काळग्रस्तांचा मागण्यांसाठी मुंडेंचं उपोषण सुरू

April 8, 2013 3:42 PM0 commentsViews: 31

08 एप्रिल

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपोषणाला औरंगाबादमध्ये आजपासून सुरूवात झाली. दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मुंडेंनी हे उपोषण सुरू केलंय. दुष्काळी भागातील जलसंधारणासाठी शिरपूर पॅटर्न वापरावा, राज्यात सिमेंटचे बंधारे बांधावेत, दुष्काळी भागात टँकर्सचा पुरवठा वाढवावी, पाण्याच्या शोधात बळी पडलेल्या 5 लाखांची मदत द्यावी, परळी थर्मलला पाणी पुरवठा करावा, एमआरईजीएसचे भत्ते लवकरात लवकर द्यावे अशा विविध 13 मागण्यांसाठी मुंडेंनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. मुंडेंच्या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा जाहीर केला.

close