‘राज्यात राज ठाकरेंची सभा होऊ देणार नाही’

April 8, 2013 3:49 PM0 commentsViews: 112

08 एप्रिल

परभणी : इथं जळगावमधल्या जाहीर सभेत मराठा आरक्षणाला विरोध करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुतळा परभणीतील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जाळला. यावेळी राज ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. तर राज्यात कुठेही राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज ठाकरे यांनी जळगाव येथे झालेल्या सभेत महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नासाठी हे नेते कधी एकत्र आले नाही. आता हे नेते मराठा आरक्षणासाठी एकत्र आले आहे. मराठा आरक्षणाची मागणी करताय पण निवडणुकांना सामोर ठेवून जनतेची माथी भडकावण्याची काम ही नेते करत आहे अशी टीका करत मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध दर्शवला होता.

close