वीरेंद्र सेहवागची पुण्याला भेट

December 26, 2008 1:25 PM0 commentsViews: 7

26 डिसेंबर, पुणेभारतीय क्रिकेट टीमसाठी पुढचे दोन महिने सुटीचे आहेत. आणि ही सुटी कशी घालवायची याच्या वेगवेगळ्या योजना क्रिकेटर्सनी आखल्यात. भारताचा धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवागनं मात्र ही सुट्टी सामाजिक कार्यासाठी सत्कराणी लावायची ठरवलं आणि याच उद्देशानं त्यानं पुण्याचा दोन दिवसांचा दौरा केला. पुण्यात त्यानं अंध मुलांची भेट घेत त्यांच्याबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्याचबरोबर त्यानं क्रिकेटमधले आपले अनुभवही या मुलांबरोबर शेअर केले. आणि या मुलांना अनमोल भेटवस्तुही दिल्या. पुण्याला येताना त्यानं आपलं क्रिकेट कीट या मुलांसाठी आणलं होतं. सेहवागचे ग्लोव्हज आणि क्रिकेट पॅड घालताना मुलांनीही एन्जॉय केलं. सेहवागच्या या भेटीमुळे या अंध मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद दिसत होता.

close