कोलकाता रायडर्सचा 19 रन्सने पराभव

April 8, 2013 6:18 PM0 commentsViews: 9

08 एप्रिल

आयपीएलमध्ये राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सनं सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. राजस्थाननं कोलकाता नाईट रायडर्सचा 19 रन्सनं पराभव केला. ब्रॅड हॉजच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थाननं पहिली बॅटिंग करत 144 रन्स केले. याला उत्तर देताना कोलकाताची टीम 125 रन्सवर ऑलआऊट झाली. सिद्धार्थ त्रिवेदी आणि केवन कुपरच्या भेदक बॉलिंगच्या जोरावर कोलकातचे बॅट्समन फ्लॉप ठरले. इयान मॉर्गेनेनं 51 रन्स करत विजयासाठी झुंज दिली. पण 19 व्या ओव्हरमध्ये कुपरनं मॉर्गेनची विकेट घेत बाजी पलटवली.

close