अजित पवारांच्या राजीनाम्यावर विरोधकांची नरमाई

April 9, 2013 9:24 AM0 commentsViews: 9

09 एप्रिल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानांचे पडसाद आजही विधीमंडळात उमटले. मात्र, विरोधकांनी कालसारखा आक्रमक पवित्रा न घेता, राजीनाम्याच्या मागणीवर काहीशी मवाळ भूमिका घेतली. पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विधानसभेत चर्चा व्हावी, तसंच मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी कालच माफी मागितली असताना, आज चर्चा कशाला अशी भूमिका सरकारतर्फे घेण्यात आली. त्यामुळे विधानसभेत गोंधळ झाला. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाईंनी अजित पवार यांच्या विरोधात निंद्याव्यंजक प्रस्ताव मांडला मात्र तो फेटाळण्यात आला. विधानसभेतला गोंधळ थांबला नाही, अखेर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

close