मुंडेंनी उपोषण मागे घ्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

April 9, 2013 9:35 AM0 commentsViews: 17

09 एप्रिल

भाजप नेते गोपीनाथ मुंडे दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये कालपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंडे यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना फोन करुन हे आवाहन केलंय. दुष्काळी भागातल्या जलसंधारणासाठी शिरपूर पॅटर्न वापरावा, राज्यात सिमेंटचे बंधारे बांधावेत, दुष्काळी भागात टँकर्सचा पुरवठा वाढवावा, पाण्याच्या शोधात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत द्यावी, परळी थर्मलला पाणी पुरवठा करावा अशा विविध 13 मागण्यांसाठी मुंडेंनी हे उपोषण सुरू केलंय. मुंडेंच्या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा जाहीर केला.

close