छातीत दुखू लागल्यामुळे लक्ष्मण माने रूग्णालयात दाखल

April 9, 2013 9:47 AM0 commentsViews: 45

09 एप्रिल

लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले उपराकार लक्ष्मण माने यांना सातार्‍याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. माने हे काल पंधरा दिवसांनी सातारा पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. आज मानेंना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार होतं. पण आज सकाळी छातीत दुखायला लागल्यानं लक्ष्मण माने यांना जिल्हा रुग्णालयात आयसीयु विभागात दाखल करण्यात आलं आहे. आता डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग लक्ष्मण माने यांना कोर्टात हजर करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याच संस्थेतल्या तीन महिलांनी त्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत. सोमवारी लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. हे सगळं आपल्याविरुद्धचं षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी या मुलाखतीत केलाय. शिवाय हरी नरके, बाळकृष्ण रेणके आणि त्यांचे कुटुंबीय, तसंच मानेंच्या संस्थेतून निलंबित करण्यात आलेले काही शिक्षक या षड्‌यंत्रात सहभागी आहेत, असाही आरोप लक्ष्मण माने यांनी केला.

close